TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चहार्डीच्या बस वाहकाची कौतुकास्पद कामगिरी ; १५ हजार प्रवाशाला प्रामाणिकपणे केले परत !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा आगाराची बस पुण्याहून परत येताना चाकण येथून काही प्रवासी बसले होते. त्यातील एका प्रवाशाचे पाकीट नजर चुकीने बसमध्ये राहून गेले होते. बस वाहकाने प्रामाणिकपणे पाकीटमधील १५ हजार रुपये रोख आणि कागदपत्र परत केल्याची सुखद घटना नुकतीच घडली.

सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या…
कितीही संकटं येऊ दे पण इमानदार राहु गड्या…!

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

काही माणसं अशी असतात की त्यांच्यामुळे त्यांच्या पदाला शोभा येत असते. खरंतर एसटी महामंडळात वाहक असणं ही एक साधारण बाब. परंतु या पदावर काम करत असताना त्याला न्याय देऊन आपल्या कर्तुत्वाने एक विशिष्ट उंची गाठणे हे काही प्रत्येकाला शक्य होत नाही काही क्वचितच कर्मचारी या ध्येयापर्यंत पोहोचतात. ही अग्निपरीक्षा नुकतीच पार करणारे चोपडा बस आगारातील वाहक दिपक खैरनार यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.

चहार्डी गावात अतिशय प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबात जन्म घेऊन दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर बस वाहकाची परीक्षा पास होऊन दिपक खैरनार हल्ली चोपडा बस डेपो येथे वाहक पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना चोपडा आगाराची बस पुण्याहून परत येताना चाकण येथून काही प्रवासी बसले होते. अनावधानाने बाळासाहेब कर्डिले या प्रवाशाचे पैशांचे पाकीट गाडीत राहून गेले व त्यांच्या हे लक्षात न येता ते बाभळेश्वर येथे उतरले. काही वेळानंतर गाडी चेक करताना वाहक दिपक खैरनार यांच्या हाती सदर पाकीट लागले. त्या पाकिटात 15 हजार रुपयांची रोख कॅश तसेच महत्त्वाचे कागदपत्रे त्यांना आढळून आले. दिपकभाऊंनी क्षणाचाही विचार न करता ते पाकीट असणाऱ्या व्यक्तींचा पाकीट मधील डॉक्युमेंट वरुन शोध घेऊन लागलीच संपर्क केला व सदर व्यक्तीला शिर्डी स्थानकात बोलवून आगार प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांच्या ताब्यात पूर्ण रक्कम व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आले.

खरंतर संस्काराच्या बाबतीत मोठमोठ्या गप्पा मारणे हे सहज सोपे आहे परंतु आपल्या हातात एवढी मोठी रक्कम पडलेली आहे आणि तिचा कोणीही वारसदार नसताना त्या व्यक्तीचा स्वतःहून शोध घेऊन त्या व्यक्तीस ती रक्कम जशीस तशी परत करणे या बाबी खरं तर त्या व्यक्तीवर झालेल्या संस्कारांची ओळख करून देतात. दिपकभाऊंच्या या प्रामाणिकपणामुळे खरंतर परिवहन महामंडळाची, कुटुंबाची ,त्यांच्या आई -वडिलांची ,परिसराची तसेच गावाची देखील मान अभिमानाने ताठ झालेली आहे.
दिपकभाऊंना त्यांच्या या प्रामाणिकपणाचे फळ निश्चितच कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळेल यात शंकाच नाही. परंतु शासन दरबारी देखील अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची कदर करून यथोचित सन्मान होणे अपेक्षित आहे. दिपकभाऊंसारखे आदर्श व्यक्तिमत्व समाजात निर्माण होणे अपेक्षित आहे. दिपकभाऊंनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्यावर एसटी महामंडळासह गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

ऊस तोडणीच्या वेळी हार्वेस्टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे मधपाळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

October 26, 2021

बेल्जिअममध्ये ९० वर्षीय महिलेला एकाच वेळी दोन विषाणूंची लागण ; उपचारादरम्यान मृत्यू

July 11, 2021

शालेय बुद्धिबळ स्पर्धा १४ वर्षा खालील गटात मुलांमध्ये खुशाल सोनार तर मुलींमध्ये अदीती अलाहीत प्रथम !

November 24, 2022

खळबळजनक : एटीएममधील भरण्याची एक कोटींची रोकड घेऊन कर्मचारी पसार !

August 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group