म्हसावद (प्रतिनिधी) कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना मंदिरावर शाळा भरून त्यांना अध्यापनाचे उत्कृष्ट असे कार्य करीत आहेत. शिक्षक आपल्या दारी पाहून विद्यार्थ्यांना ही नवचैतन्य मिळत आहे. परिसरात ज्ञानोदय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय म्हसावद शाळा व शिक्षकवृंदांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन व मंदिरावर अथवा उपलब्ध असेल अश्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करत आहे. यासाठी राजेंद्र भावराव जोगी, प्रशांत रवींद्र पाटील हे शिक्षक बोरणार, म्हसावद, नागदुली येथे जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे शिकवत आहेत. संस्थेचे अध्यक्ष पंकज साळुंखे व मुख्याध्यापिका दिपाली पाटील यांनी वैचारिक सबळता निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा गेलेला वेळ भरून निघावा, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. व त्या भावनेतून विद्यार्थी व शिक्षक हे नाते वृद्धिंगत होण्यासाठी बळ मिळते. असे शिक्षक वृंद यांना सांगितले. खेड्यातील पालकांची मोबाईल घेण्याची व डिजिटल साहित्य उपलब्ध होण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने शिक्षक मंदिरावर शाळा भरून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.















