जळगाव (प्रतिनिधी) बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे तीन प्रकरणापैकी दोन प्रकरणांसाठी ३० हजारांची मागणी करत पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या जळगाव महापालिकेतील रचना विभागाचे नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज समाधान वन्नेरे यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात महापालिका आयुक्त आणि नगर रचना अधिकारी दिघेश तायडे यांचे देखील नाव समोर आले होते. तायडे यांची एसीबीने मंगळवारी तब्बल चार तास चौकशी केली होती त्यानंतर आज महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे चौकशीसाठी हजर झाले होते.
ज्ञानेश्वर ढेरे यांची एसीबीकडून तब्बल 3 तास चौकशी !
बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्वीकारणारा सहायक अभियंता मनोज वन्नरे याला अटक केल्यानंतर या प्रकरणी नगररचना शाखेचे सहायक संचालक दिगेश तावडे यांची एसीबीने मंगळवारी चार तास चौकशी केली होती. त्यानंतर आज बुधवारी महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची देखील एसीबीकडून तब्बल तीन तास चौकशी झाल्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात उडाली प्रचंड खळबळ उडाली आहे.
१५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या जळगाव महापालिकेतील रचना विभागाचे नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज समाधान वन्नेरे यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात महापालिका आयुक्त आणि नगर रचना अधिकारी दिघेश तायडे यांचे देखील नाव समोर आले होते. त्यानुसार तायडे यांची एसीबीने मंगळवारी तब्बल चार तास चौकशी केली होती. त्यानंतर आज महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे सायंकाळी साडेपाच वाजता चौकशीसाठी हजर झाले आहेत. रात्री साडेआठ पर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. ढेरे यांनी आपला जबाब एसीबीकडे नोंदवला आहे.
एसीबीच्या चौकशीमधे आता नेमकं काय समोर येते आणि त्यात कुणाकुणावर कारवाई होते, याकडे सगळ्याचे लागून आहे. अगोदरच मनपा मधील ब्रिटिश कालीन कोट्यावधी रुपयांची पाणी पुरवठा योजनेचे पाईप चोरी झाल्याचे प्रकरण गाजत असताना,आता अधिकाऱ्यांचे लाच प्रकरण ही समोर आल्याने मनपामधील भ्रष्टाचार आणि खाबुगिरी जनतेमधे संतापाचा विषय बनला आहे.
एसीबीला चौकशीत संपूर्ण सहकार्य केले असून माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. महापालिकेची दाखल्या संबंधी संपूर्ण प्रक्रिया जबाबात नोंदवली आहे.
ज्ञानेश्वर ढेरे
(जळगाव महापालिका आयुक्त)
काय आहे प्रकरण ?
जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण जळगाव महानगरपालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले, तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले, असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पथकाने सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला होता.
दरम्यान पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांना रंगेहात पकडण्यात आले होते.