जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात वेळोवेळी संपर्क साधूनही अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी अनिल माणिकराव हे कुणाचाही फोन उचलत नाही. याची राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी थेट अन्न औषध प्रशासन मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासन मंत्र्यांनी देसले यांना दिले आहे.
जिल्ह्यात रेेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात वेळोवेळी संपर्क साधूनही अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी अनिल माणिकराव हे कोणाचाही फोन घेत नाहीत. तसेच त्याबाबत माहितीही देत नाहीत, या आशयाची तक्रार राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांना प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी आज केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा परस्पर काळाबाजार सुरू असल्याचा संशय असून त्याची रीतसर चौकशी करण्यात यावी, असेही देसले यांनी मंत्री ना. शिंगणे यांना फोनद्वारे सांगितले आहे. यावर चौकशी करण्याचे आश्वासन ना. शिंगणे यांनी दिले आहे.