TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समाजाला करिअरचा कॅन्सर झालाय : प्रा. रमेश महाजन !

चोपडा येथे रोटरीच्या नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण प्रसंगी प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) पूर्वीच्या काळी शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर असे होते तिथे खरोखरच जीवनाचे शिक्षण तेव्हा मिळत होते. तेव्हा विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्यांच्यावर संस्कार केले जात होते. आज मात्र पालकांच्या अवास्तव अपेक्षा, मुलांवर सांगितला जाणारा मालकी हक्क यामुळे मुलांची भावनात्मक कोंडी होऊ लागली आहे. त्यातून मुलांच्या आत्महत्येची संख्या वाढू लागली आहे. मुलांना शाळेतही व्यक्त होता येत नाही. त्यांच्या आवडी, कल, कौशल्य लक्षात न घेता त्यांच्यावर करियरसाठी लहान वयातच दबाव वाढत आहे. एक प्रकारे समाजाला ‘करिअरचा कॅन्सर’ झालाय, असे परखड मत मांडताना शिक्षकांनी संवादी बनावे, असे धरणगाव येथील विक्रम ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा. रमेश महाजन यांनी व्यक्त केले.

रविवारी सायंकाळी आनंदराज पॅलेस या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे आयोजित ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात ते ‘विद्यार्थी केंद्रीत शिक्षण आणि शिक्षकांची भूमिका’ या विषयावर बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रातील प्रत्येक समस्येला स्वतःला जबाबदार समजणारा शिक्षक हाच खरा आदर्श शिक्षक होय. शिक्षक हा उत्तम व्यवस्थापक असावा, तो संवेदनशील असावा. शिक्षकाने आई होत मुलांच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा दिली पाहिजे. समाजातील गुणवंत शिक्षकांची विना शिफारस निवड केल्याबद्दल त्यांनी रोटरीचे अभिनंदन केले. यावेळी मंचावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे. गौरव महाले, प्रकल्प सहप्रमुख रोटे. महेंद्र बोरसे, रोटे. संजय बारी हे उपस्थित होते.

READ ALSO

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

प्रा. रमेश महाजन यांच्या हस्ते मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीत अर्चना रवींद्र शिंदे (जि प प्राथमिक शाळा, कमळगाव), प्रल्हाद उत्तम पाटील (जि प प्राथमिक शाळा, धानोरे प्र चोपडा), रवींद्रकुमार भीमराव पाटील (जि प मराठी मुलांची शाळा नं.३, चोपडा), पवन पांडुरंग रणधीर (जि प प्राथमिक शाळा, कुंड्यापाणी), भावना रमेश पाटील (जि प मुलींची शाळा, अडावद),  तब्बसुम बानो अल्ताफ अली सय्यद (उर्दू हायस्कूल, अडावद), दीपक भास्कर पाटील (सौ प.रा. भादले प्राथमिक आश्रम शाळा, उमर्टी), नितीन मधुकर पाटील (मातोश्री अवंताबाई पाटील अनुदानित आश्रम शाळा, संपुले), अमित आनंदराव बाविस्कर (आश्रम शाळा, हातेड), अनंत श्रीराम पाटील (नूतन माध्यमिक विद्यालय, चुंचाळे), सुरेश शंकर चौधरी (अण्णासो एस. आर. पाटील माध्यमिक विद्यालय, मामलदे) या शिक्षक बंधू भगिनींना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक अध्यक्ष चेतन टाटिया यांनी, सूत्रसंचालन संध्या शहा यांनी व आभार प्रदर्शन अर्पित अग्रवाल यांनी केले. सोहळ्यास तालुक्यातील शिक्षक त्यांचे परिवार जन व रोटेरियंस उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

शौचास बसण्यावरून वाद ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे भावपुर्ण अभिवादन !

April 11, 2021

विहीर खोलीकरणासाठी रात्री तीन मजुर उतरले पण पुढे घडलं भयंकर !

April 20, 2023

खडसेंच्या व्हायरल क्लिप बद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणतात…!

September 29, 2020

मला दबावतंत्र वापरायचं नाही : पंकजा मुंडे

July 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group