
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शहर व जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या गोकुळ साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोरसर, ता. बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश) या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.
शहरातील बळीराम पेठेतील गोपाल स्टेशनरी दुकाना समोरुन दि. ३० ऑक्टोंबर रोजी दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलीसांना समांतर तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक चोरट्याच्या शोधार्थ रवाना झाले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपास सुरु केला असता, हा चोरटा मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित गोकुळ पाटील याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या सात व जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ अशा एकूण ९ दुचाकी काढून दिल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहे.
या पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड, पोनि सागर शिंपी यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक दीपक जगदाळे, अतुल वंजारी, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रिजवान शेख, पोहेकॉ विरेंद्र शिंदे, सतिष पाटील, अमोल ठाकूर, प्रणय पवार, कुंदनसिंग बयास, मुबारक देशमुख, विकास पवार, हर्षल महाजन, गौरव पाटील, मिलींद जाधव यांच्या पथकाने केली.

















