जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय १६ वर्षाखालील स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत उस्मानाबाद येथे तर १८ वर्षाखालील स्पर्धा ५ ते ७ मार्च या कालावधीत बीड येथे होत आहे. या स्पर्धांमध्ये नाशिक विभागाचा संघ सहभागी होणार आहे. यासाठी जिल्हा संघनिवड चाचणी स्पर्धेचे आयोजन पासींग व्हॉलीबॉल असोसिएशन जळगाव’तर्फे करण्यात आले आहे.
७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नूतन मराठा हायस्कूल येथे निवड चाचणी होईल या निवड चाचणीतून जळगाव चा संघ निवडला जाईल व तो नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. सोळा वर्ष सबज्युनियर स्पर्धेसाठी खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २००५ यानंतर जन्मलेला असावा तसेच १८ वर्ष वयोगटातील मुलं आणि मुली १ जानेवारी २००३ नंतर जन्मलेला असावा. खेळाडूंनी आपल्या जन्मतारखेच्या प्रमाणपत्र, आवश्यक किट सह प्रवेश शुल्क सहित उपस्थिती द्यावी असे आवाहन पासिंग व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख व सचिव अंजली पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.