धरणगाव (प्रतिनिधी) पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा नुकताच नगरसेवक अजय चव्हाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शहरातील जाणाऱ्या मुस्लिम बांधवांचा माजी नगरसेवक अजय चव्हाण यांच्या वतीने बुधवारी रात्री पुष्पगुच्छ देऊन हज यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पालिकेतील माजी गटनेते पप्पू भावे, जंगलू चव्हाण आणि हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम भाविक बंधू उपस्थित होते.











