नशिराबाद (प्रतिनिधी) युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा हा आगळा वेगळा राज्यव्यापी आंदोलन करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवासेनेतर्फे आंदोलन संपन्न झाले. नशिराबाद बाजारपेठेत युवासेना जळगाव ग्रामीणतर्फे थाळी वाजवून, घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, युवासेना विस्ताराक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, युवासेना नशिराबाद शहरप्रमुख चेतन बर्हाटे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, विनय लाड, अतुल वंजारी, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, सरपंच विकास पाटील, सं.गा.यो सदस्य चंदु भोळे, नितीन बैंडवाल, दगडु माळी, तेजस माळी, सुनिल महाजन, निलेश धनगर, मनोज देशमुख, कैलास नेरकर, आबा माळी, दर्शन झटके, निलेश नाथ, दिनेश माळी, वासु कोलते, महैंद्र कोळी, मनोज नाथ, पराग देवरै, तनवीर, फिरदोस सय्यद, करीम शैठ सत्तार मेंबर, प्रकाश महाजन, चंद्रकांत पाटील, नोमदास रोटे, संदीप पाटील, आप्पा धर्माधिकारी यासह शेकडो आदी युवासैनिक उपस्थित होते.