भुसावळ (प्रतिनिधी) शहरात कॉग्रेस कमिटी तर्फे कॉग्रेस पक्षाचा १३६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माजी आमदार निळकंठ फालक यांनी पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर भुसावळ शहरृ कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविंद्र निकम यांनी प्रास्तविक केले. कॉग्रेस स्थापना दिनाबद्दल माजी आमदार निळकंठ फालक, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुन्वर खान यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे. बी. कोटेचा, जशपालसिंग गील, माजी आमदार निळकंठ फालक, शहर अध्यक्ष रविंद्र निकम, जिल्हा अध्यक्ष मुन्वर खान, शैलेश अहिरे, विलास खरात, संतोष साळवे, सलिम गवळी, राम अवतार परदेशी, ‘संपूर्ण महिला कार्यकर्तेचे पुष्पहार देवुन स्वागत करण्यात आले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन देणाऱ्या व त्यानंतर देशाच्या विकासाचा भक्कम पाया रचणार्या कॉग्रेस पक्षाचा २८ डिसेंबर हा वर्धापन दिन म्हणजे कोट्यवधी कार्यकर्ते व जनतेच्या दुष्टीने ऐतिहासिक प्रेरणादिन होय. देशाला नेतृत्व दिले. देशाच्या वाटचालीचा भक्कम पाया रचला, देशाला आत्मनिर्भर केले. त्याच बरोबर लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्मसमभाव आणि सामाजिक समता जोपासण्याच काम कॉग्रेस पक्षाने केलं. असे विचार माजी आमदार निळकंठ फालक, शहर अध्यक्ष रविंद्र निकम, जिल्हा अध्यक्ष मुन्वर खान, यांनी व्यक्त केल. यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, महेंद्र महाले, जिल्हा अध्यक्ष असंघटीत कामगार गणेश बारसे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलीम गवळी, सरचिटणिस शैलेश अहिरे, इसाक चौधरी, हमीद सर, शरद खराटे, जिल्हा महिला सचिव राणी खरात, यास्मीन, बी. सुजाता सपकाळे, दुर्गाबाई सोनवणे, वंदना चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.