जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवार दि. २३ जून रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.
दि. २३ रोजी स. ५.३० वा. भुसावळ येथे त्यांचे आगमन, सकाळी ५.४५ वा. हॉटेल तनारीका, भुसावळ येथे आगमन व राखीव, सकाळी ८.०० वा. भुसावळ येथून फैजपूर, ता. यावल कडे प्रयाण, सकाळी ९ वा. धनाजी नाना महाविद्यालय येथे आगमन व स्वागत, सकाळी ९.३० वा. धनाजी नाना महाविद्यालय येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्याचे दहन आणि यावल, रावेर, मुक्त ाईनगर या तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा. सकाळी ११. वा. फैजपूर येथून रामचंद्र हॉल, भुसावळ कडे प्रयाण, सकाळी ११.३० भुसावळ येथे रामचंद्र सभागृहात भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकर्यांचा मेळावा आणि कार्यकर्ता संवाद, दुपारी १ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड सेंटरला भेट व कोविड योध्यांचा सन्मान आणि जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक, दुपारी २.३० वा. जळगाव खु. येथून जळगाव कडे प्रयाण, दुपारी ३ वा. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, सायंकाळी ५ वा. काँग्रेस भवन येथे शहर व ग्रामीणमधील कार्यकर्त्यांशी संवाद, सायंकाळी ६ वा. एरंडोलकडे प्रयाण, सायंकाळी ७.१५ वाजता धरणगाव येथे आगमन व स्वागत, सायंकाळी ७.३० वा. अमळनेर कडे प्रयाण, रात्री ८ वा. अमळनेर येथे चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद, रात्री. ९.३० वा. किसान काँग्रेस बैठक, रात्री १०.३० वा. अमळनेर येथून धुळ्याकडे ते प्रयाण.















