अमळनेर (प्रतिनिधी) केंद्राच्या शेतकरी व कामगार कायद्यांच्या विरोधात जळगाव जिल्हा काँग्रेसने ५ लाख स्वाक्षऱ्यांचे लक्ष्य निश्चित केले असून अमळनेर येथील महात्मा फुले मार्केट परिसरात मंगळवारी “रद्द करा रद्द करा, किसानविरोधी विधेयके रद्द करा” असा नारा देत स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.
त्यासाठी अमळनेर येथे जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ व जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील महात्मा फुले मार्केट परिसरात मंगळवारी “रद्द करा रद्द करा, किसानविरोधी विधेयके रद्द करा” असा नारा देत स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.
यावेळी केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणांबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निरीक्षक राम पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जेष्ठ नेते धनगर पाटील, मुन्ना शर्मा, बन्सिलाल भागवत, सत्तार मास्तर, सईद तेली, प्रताप आबा, गजेंद्र साळुंखे, राहुल गांधी विचारमंच जिल्हाध्यक्ष रहेमान खाटीक,महिला काँग्रेस अमळनेर अध्यक्षा राजश्री पाटील, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष महेश दगडु पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, सचिव कुंदन निकम, सचिव मयुर पाटील, सचिव मनोज बोरसे, राजु शेख, इद्रिस बागवान, इम्रान शेख, राजू टेलर, शादाब तेली, संजय पाटील, राकेश पवार, अब्दुल पठाण, रईस शेख, साबिर बागवान, अहमद पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.