TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेसचा स्वबळाचा नारा; नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत खळबळ

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकासआघाडी सरकारचा प्रयोग केला. त्यानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना महाराष्ट्रात काँग्रेसचे नवे, होऊ घातलेले प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. नाना पटोले हे सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.

काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड अंतिम मानली जात आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्याने त्यांच्यावरी भार कमी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या नेत्याकडे सोपवलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेतही दिले होते. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबत त्यांनी सूचक विधानही केलं आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. सरकार भक्कम असून पुढील निवडणुकांमध्येही तिन्ही पक्ष एकत्र असतील असं वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत कसा येईल असं सांगत सूचक विधान केलं आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, “आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल”. दरम्यान गुरुवारी नाना पटोले पाडळे लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी लवकरच मला नवी भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर असेपर्यंत नागरिकांची काही कामे तातडीने करणार आहे, असे सूचक वक्तव्य केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यावर पहिल्यांदाच पटोले यांनी प्रतिक्रिया देऊन प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.

नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्याला पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, असं विधान केलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी हे सरकार अनेक वर्षे टिकेल असे दावे केले होते. पण, सरकार येऊन एक वर्ष झालं नाही तर काँग्रेस मध्ये स्वबळावर सत्ता येण्याचा नारा आत्ताच देण्यात आला आहे.

आघाडी सरकार चालवताना तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसच्या होऊ घातलेल्या प्रदेशाध्यक्षांनी थेट स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल का? आपल्याच मित्र पक्षाविरोधात लढले का? आणि याचा परिणाम महाविकासआघाडी सरकारवर होईल का, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात CBI कडून गुन्हा दाखल; ५.६२ फेसबुक डेटा चोरी केल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सविता सोनवणे बिनविरोध !

October 26, 2023

कृषी कायद्यांचा नवा प्रस्ताव अमान्य, अण्णा हजारे उपोषणाला बसणार

January 29, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २४ ऑक्टोबर २०२२ !

October 24, 2022

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आमदार भडकले, शिंदे यांच्या अंगावर धावून गेले? ; शिवसेना खासदारच्या दाव्याने खळबळ !

July 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group