पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रारीच्या निवारणासाठी ४ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस हवालदाराला पाचोरा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी घडली.
तक्रारदार शेतकऱ्याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधिताने ती परत दिली नाही. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत तक्रार दाखल होती. मात्र, या तक्रारदारावरच गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पोलीस हवालदार राकेश खोंडे यांनी पाच हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराकडे चार हजार असल्याने तडजोड करून रक्क देण्याचे ठरले. परंतू यानंतर तक्रारदाराने जळगाव लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरण तक्रार करून मंगळवारी जळगाव एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर एक चहाच्या टपरीवर चहावाल्याक रक्कम जमा करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल राकेश खोंडे आणि चहावाल्यास लाचलुचपत विभागा रंगेहाथ पकडले. जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश सिंग पाटील, सहायक उपनिरीक्षक सुरेश पाटील, कॉ. अशोक अहिरे, बाळू मराठे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, रमेश ठाकूर यांच्या पथकाने यशस्वी सापळा रचून लाचखोर पोलिसास रंगेहाथ पकडले.