एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळकोठाजवळ औषधे घेऊन जाणारे कंटेनर व समोरून येणारे टॅकर यांची धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांवरील चालक ठार झाले. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्याने औषधी जळून खाक झाली. एरंडोल पालिकेच्या अग्निशमन पथकाने चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिंपळकोठा गावाजवळील हॉटेल पंजाब समोर झाला.
धुळ्याकडून जळगावकडे जाणारे टॅकर (एम.एच.२४ बी.जी. ९८३७) तसेच जळगावकडून धुळ्याकडे जाणारे कंटेनर (एन.एल.०९ क्यू ७९५१) यांच्यात धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे चालक बिंदू मेहताब देहारीया व संतोषकुमार राजाराम यादव गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. पिंपळकोठा येथील लहू अभिमन्यू चव्हाण आणि राजेंद्र सुभाष बडगुजर हे सकाळी फिरण्यासाठी गेले असता त्यांना अपघात झाल्याचे दिसले.
यानंतर सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार काशिनाथ पाटील, अकिल मुजावर अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी चालकांना होती. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात आणले. नंतर दोघांचा मृत्यू झाला, तर अपघातात दोन्ही वाहनांचे क्लीनरही जखमी झाल आहेत. प्रथमोपचार करून त्यांना जळगावाला रवाना केले. अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली याबाबत कंटेनर चालकाविरोधात एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती.