जळगाव (प्रतिनिधी) आशादीप मुलीचे वसतीगृहात अधिकारी व कर्मचारी तेथील मुलींना योग्य वागणूक देत नाहीत. तरी या प्रकरणाची तक्रार नोंदविण्यात यावी. तसेच आशादीप वसतीगृहातील वादग्रस्त प्रकरणाची चौकशी व्हावी, असे निवेदन भाजप महिला मोर्चा अध्यक्षा दीप्ती अश्विन चिरमाडे यांनी आज पोलीस अधीक्षकांकडे दिले आहे.
पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आशादीप मुलीचे वसतीगृह गणेश कॉलनी येथे वसतीगृहातील अधिकारी व कर्मचारी मुलींना योग्य वागणूक देत नाही. तसेच मुलींवर अत्याचार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरी याप्रकरणी चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी. असे निवेदनात म्हंटले आहे. महापौर भारती सोनवणे, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा दीप्ती अश्विन चिरमाडे, भाजपा सरचिटणीस महिला मोर्चाच्या रेखा वर्मा आदींनी यावेळी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.