जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळयामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वातारवण ढवळून निघालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी ‘सहकार आणखी भ्रष्टाचार’ या शीर्षकाखाली लिहिलेला लेख सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. विना सहकार नाही उद्धार ! असे नेहरूंचे घोषवाक्य होते. पण विना सहकार नाही भ्रष्टाचार ! असे अनुभव आल्याचे श्री. पाटील यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
शिवराम पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी
सहकार म्हणजे आपण सहकारी मिळून भांडवल जमवणे. त्या भांडवलसोबत सरकार कडून मदत घेणे.आणि आपला आपण कारखाना, पतपेढी वगैरें स्थापन करणे. सरकारी संस्था या मंत्री च्या अधीन असतात.तेच त्यावर नियंत्रण ठेवतात.धोरणात्मक बदल करतात.पण ही संधी सर्वांना मिळत नाही. म्हणून नेहरुंनी सहकार ची संकल्पना मानली.चीन मधील कम्युन तत्वावर भारतात सहकार तत्व राबवले.विना सहकार नाही उद्धार!असे नेहरूंचे घोषवाक्य होते.पण बिना सहकार नाही भ्रष्टाचार ! असे अनुभव आलेत.
यशवंतराव चव्हाण हे नेहरूंच्या विचारांचे असल्याने सहकार चळवळ महाराष्ट्रात लवकर रूजली.फोपावली. सहकार म्हणजे आपण सहकाऱ्यांनी पैसा जमा करायचा.आणि साखर कारखाना काढायचा.त्याचा आर्थिक व्यवहार, धोरण,प्रशासन आपण संचालक मंडळाने पाहायचा.पैकी एक जण चेयरमन.
सहकार तत्व वरकरणी चांगले वाटत असले तरी ते पांडवांच्या दौपदीसारखे नसते, कि भिक्षा मिळाली तर पांच भावांनी वाटून खावी.येथे एकट्यानेच फस्त करण्याचे ठरवले.त्याला इंग्रजीत चेयरमन म्हणतात. मराठीत चोरमन म्हणतात.शब्दशः अर्थ अध्यक्ष होत असला तरी गुणात्मक अर्थ चोरमन असाच होतो.हे त्यांनीच सिद्ध केलेले आहे.
समाजात अनेक लोकांकडे अतिरिक्त पैसा पडून असतो.जो बायको पोरांना ही माहीत नसतो.हा पैसा खूप त्रासदायक असतो.माहिती पडले कि नाते बिघडते.या पैशाला धुर्त माणूस हेरतो.तो साखर कारखाना, सुतगिरणी,पतपेढी काढतो.माझ्याकडे १०० रूपये शेयर केले कि मी तुम्हाला दरवर्षी २५ रूपये डिव्हीडंट देईन.तुमचे १००रूपये जसेच्या तसेच.असे बिनकष्टाचे,हरामाचे २५रूपये दरवर्षी मिळत असतील तर मुर्खाला हवेच असतात. म्हणून तर तो मुर्ख माणूस धुर्त माणसाच्या कंपनीचे,पतपेढी चे शेयर घेतो. हे प्रवर्तक व शेयरहोल्डर तसेच चेयरमन व ठेविदार दोन्ही अनैतिक प्रवृत्ती चे असतात. एकाला लोकांचा पैसा पाहिजे.दुसऱ्याला पैशाचे व्याज पाहिजे. व्याज म्हणजे बिनकष्टाचा पैसा.सुरुवातच अनैतिक हेतूने होते.
समाजात बहुसंख्य मुर्ख असतात आणि क्वचित धुर्त असतात.हे धुर्त लोक मुर्खांची नाळ ओळखतात.प्रलोभन देतात.आणि पैसा ठेव म्हणून ठेवून घेतात.असे बहुसंख्य मुर्खांची ठेव जमा झाली कि,धुर्त कर्ज घेतात.ठेविदार बहुदा नोकर,मजूर असतात.कर्जदार बहुधा व्यापारी आणि पुढारी असतात.असे बीएचआर मधील ठेविदार व कर्जदारांच्या यादीवरून लक्षात येते.कर्ज फेडायचे नाही, असा विचार करूनच कर्जदार कर्ज उचलतात.अगदी गरज नसताना. अडचण नसतांना.बीएचआर मधील सर्वच कर्जदार हे श्रीमंत आहेत.गर्भश्रीमंत आहेत.त्यांना कर्ज काढण्याची गरज नाहीच.तरी का घेतले कर्ज?ते बुडवण्याच्या हेतूनेच.
पतपेढीचे रजिस्ट्रेशन जरी सरकार करीत असले तरी कर्जदारांवर सरकारचे नियंत्रण नसते. म्हणजे पतपेढीत ठेवलेले पैसे कुत्र्याच्या तोंडात ठेवलेले मटण. तो केंव्हाही खाऊ शकतो,गिळू शकतो. कुत्र्याने मटण खाऊन घेतल्यावर तुम्ही कितीही कायदा लावला,अंकात केला,संताप केला ,कुत्रा मारून टाकला तरीही त्या कुत्र्याचे मटण खाऊ शकता का?असा विचार ठेविदारांनी आधीच केला पाहिजे.
जो धुर्त माणूस पतपेढी काढतो तो सहकार कायद्याचा पुर्ण अभ्यास करतो.चोरीच्या पळवाटा शोधतो.त्याचे अर्थतज्ञ, सीए,वकील यांचेशी संबंध असतात.खटला लढवायचे करार असतात. अशी अफरातफर केली तर किती शिक्षा?तशी अफरातफर केली तर किती शिक्षा?असे कोष्टक आधीच अभ्यासलेले असते.म्हणून पतपेढी योजनाबद्ध रीतीने डबघाईस आणली जाते.चुकीने किंवा दुर्दैवाने नाही.
दुसरीकडे पतपेढीतील ठेविदार हा सहकार कायद्याबाबत अशिक्षित असतो.अडकलेले पैसे काढण्याचे त्याला काहीच ज्ञान नसते.आपल्याला बिनकष्टाचे व्याज मिळणार आहे,या खुशीत तो बुद्धी गहाण ठेवतो. ठेविदाराने एक लाख ठेव ठेवली.एफडी घेतली.तिचे पैसे मिळत नसतील तर वकील लावला तर फी पंचवीस हजार द्यावे लागतील. ते सुद्धा आता हातात नसतात. पण एक हजार ठेविदारांनी प्रत्येकी एक लाख ठेव ठेवली तर हजार लाख होतात.इतके पैसे बुडवले आणि वकील लावला तर आधिकतम एक लाख फी द्यावी लागेल.ते तर बुडीत रकमेतून सहज उपलब्ध होतात.म्हणून ठेविदार कमजोर आणि चेयरमन प्रबळ ठरतो.
असाच प्रकार सहकारी साखर कारखाना व सहकारी सुतगिरणी बाबत झाला.प्रवर्तकने शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून शेती बँकांकडे गहाण ठेवली.त्या रकमेचे शेयर दिले.प्रत्यक्ष हातातून पैसा दिला नाही, परस्पर कर्जाचा गेला म्हणून शेतकरीला कळ लागली नाही. पण जेंव्हा ऊसाचे पैसे मिळणे बंद झाले, कारखाने बंद पडले आणि इकडे कर्जवसुली चा तगादा सुरू झाला तेंव्हा शेतकरी खळबळून जागा झाला. तोपर्यंत चेयरमन माणूस आमदार, खासदार, मंत्री बनला.आता तोच कारखाना चेयरमनने हेतूपुरस्कर बंद केला.लिलाव काढला.आणि नातेवाईकाचे नावाने घेतला.६०कोटीच्या कारखाना ३०कोटीत मिळवला. आता चेयरमन मालक झाला. इकडे शेतकरी कर्जबाजारी बनला.
शेतकरी मुळातच कायद्याचा अभ्यास करीत नाहीत. शेतकऱ्यांची मुले शहरात नोकरीला गेली कि,ते स्वताला सरकारी आधिकारी समजू लागतात. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे,हे सुद्धा भुल देणारे वाक्य बोलतात.हे शेतकरी हक्काची धार बोथट करणारे वाक्य आहे.असे वाक्य बोलणाऱ्यावर मला संशय येतो.असे बोलण्याची गरज का पडली असेल?आम्हाला भावनिक नामोहरम करण्याचा हा प्रयत्न असतो.असे विषयांतर ही पळवाट असते.तो यशस्वी होतो.आम्ही पराभूत.शेतकरीच्या मुलाकडून शेतकरी पराभूत.
पतपेढीत ठेवलेले पैसे,कारखानाच्या शेयर मधे अडकवलेले पैसे परत मिळण्यासाठी सरकार सक्षम नाही. जबाबदार नाही.असे समजून शहाणे झाले पाहिजे. ज्या विषयाचा अभ्यास आहे,त्याच विषयात व्यवहार केला पाहिजे. आपल्यापेक्षा जास्त हुषार,चालाख ,बुद्धिमान माणसासोबत व्यवहार करतांना सावधगिरी बाळगली पाहिजे. मृत्यूचे भय सांगून विमा उतरवला जातो.डिव्हीडंट चे प्रलोभन देऊन शेयर विकले जातात.व्याजाची लालच दाखवून ठेवी ठेवल्या जातात.आमचे भय,आमची लालसा आणि बौध्दिक कमजोरी हिच आमच्या लुटमारीचे कारण बनते. आपल्याला मिळालेले धन हे आपल्या जैविक सुखसोयींसाठी असते.ज्यांना धनाचा वापर करता येत नाही त्यांचेसाठी विमा,ठेवी,शेयर ची तरतूद उपलब्ध आहे.
…शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.
सूचना : या लेखात व्यक्त केले गेलेले विचार लेखकाचे स्वतःचे विचार आहेत. या लेखातील टीका, टिप्पणी, अथवा सत्यतेप्रती ‘क्लिअर न्यूज’ उत्तरदायी नाहीय. या लेखातील सर्व मुद्दे जशीच्या तशी घेण्यात आली आहेत. या लेखातील कोणतीही माहिती अथवा व्यक्त करण्यात आलेले विचार ‘क्लिअर न्यूज’चे नाहीत.