जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालात आज जिल्ह्यातून ९०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात ३०४ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याचा दिशेने वाटचाल करत आहे.
आजची आकडेवारी
आजच्या अहवालात जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर तालुक्यात संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता जळगाव शहर-६७, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-३०; अमळनेर-२८; चोपडा-५२; पाचोरा-६; भडगाव-२; धरणगाव-५; यावल-६; एरंडोल-८; जामनेर-२९; रावेर-९; पारोळा-२; चाळीसगाव-२९; मुक्ताईनगर-६; बोदवड-७ आणि इतर जिल्ह्यांमधील १० असे एकुण ३०४ रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आज ९०९ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्यांची संख्या ४१ हजार ४५४ इतकी झाली आहे. तर आज ६ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११९० वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८४० रूग्णांवर उपचार सुरू आहे.