जळगाव प्रतिनिधी । आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्याने ८७८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४० हजार १६५ इतकी झाली असून त्यातील २९ हजार १६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत १००८ रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. तथापि, (दि.१५) रोजी ७०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांची संख्या :-
जळगाव शहर-१५०;
जळगाव ग्रामीण-४९;
भुसावळ-५१;
अमळनेर-१२६;
चोपडा-१२४;
पाचोरा-३७;
भडगाव-३५;
धरणगाव-४८;
यावल-१९;
एरंडोल-३४,
जामनेर-५६;
रावेर-२२;
पारोळा-३४;
चाळीसगाव-२५;
मुक्ताईनगर-१९,
बोदवड-४०
दुसर्या जिल्ह्यांमधील ९ असे
एकुण ८७८ रूग्ण आढळून आले आहेत.