कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील राजाभाऊ मंत्री पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाइन संपन्न झाली. संस्थेच्या आवारात संस्थेचे चेअरमन पांडुरंग वाणी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा उपनिबंधकासह संस्था जळगाव यांचे आदेशाने ऑनलाइन पार पडली. तसेच अजेंड्यावरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यावेळी सभेत मयतांना श्रद्धांजली वाहण्यात आली व कोविड१९ ने मृत्यू पावणाऱ्या सभासदांच्या वारसांना १० हजार देण्याचे मंजूर करण्यात आले.
यावेळी संस्थेत सन २०१९/२० या आर्थीक वर्षात संस्थेस चढत्याक्रमाने विक्रमी असा नफा रुपये ३६९०७२३ झाला असुन सभासदांना १५%प्रोरेटा पद्धतीने लाभांश वाटप सुरू असुन सभासदांना ६०० रुपये मिटींग भत्ता अदा करण्यात आला असुन संस्थेत सतत ऑडीट ‘अ’ मिळाला आहे. सभेत मयतांना श्रद्धांजली वाहण्यात आली व कोविड१९ ने मृत्यू पावणाऱ्या सभासदांच्या वारसांना १०००० रुपये मदत देणे बाबत व कोविड१९ मदत निधी तयार करणेबाबत आयत्यावेळी येणाऱ्या विषयात मंजूरी देण्यात आली. प्रत्येक सभासदाचा तीन वर्षांचा १००००० रुपये अपघात विमा उतरविण्यात आला असुन त्यात दोन सभासदांच्या वारसांना लाभ देण्यात आला. सभेतील अहवाल वाचन व आभार व्यवस्थापक यांनी केले. सभेत ऑनलाईन कॅनडातून सभासद सुरेश सूर्यवंशी यांनी सहभाग नोंदविला. सभा खेळीमेळीच्या व कोविड१९ दुःखात पार पडली. सभेत प्रत्यक्ष ८ सभासदांनी हजेरी लावली. संस्थेत २०२०/२१ या आर्थिक वर्षात नफा ३२७६१९२ रुपये असुन व १५%प्रोरेटा पध्दतीने लाभांश व मिटिंग भत्ता देण्याचा मानस! संस्थेत ३१ मार्च २०२१ अखेर कोविड१९ ची महामारी असतांना देखील ३२७६१९२ रुपये इतका नफा झाला असुन या वर्षी देखील सभासदांना १५% दराने नफा व मिटिंग भत्ता देण्याचा मानस असल्याचे चेअरमन व व्हा. चेअरमन संचालक व व्यवस्थापक यांनी नमुद केले. व सर्व सभासद ठेवीदार व कर्जदार यांचे मनपूर्वक आभार मानले व संस्थेवर असेच प्रेम राहू दयावे अशी विनंती देखील करण्यात आली आहे.