नंदुरबार (वृत्तसंस्था) देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी कोरोना लस देण्याचा ड्राय रन सुरू झालेला आहे. हा ड्राय रन सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा यंत्रणेने पुर्ण तयारी केलेली दिसून आली. विशेष म्हणजे एका व्यक्तीला लस घेण्यासाठी चार ते पाच मिनिटांचा वेळ लागतो.
सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी ड्राय रनला सुरुवात झालेली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हा ड्राय रन सुरू झाला असून, या ठिकाणी जे आरोग्य सेवक आहेत ज्यांच्या रजिस्ट्रेशन आधी झालेला होत, त्यांना या ड्राय रनमध्ये लस देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे काहीशी भीती या ड्राय रन दरम्यान लस घेण्याच्या प्रात्यक्षिकांचा समावेश असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आली. नंदुरबार येथे ड्राय रन मध्ये पहिली लस घेण्याचा मान रेशमा चाफेटकर या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला मिळाला. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण जेव्हा खऱ्या अर्थाने सुरू होईल तेव्हा इंटरनेट सेवा, आणि वीज सुरू राहील यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. जनरेटरने वीज उपलब्ध केली जाईल शिवाय मोबाइल नेटवर्क खंडीत होणार नाही, यासाठी मोबाईल कंपनीशी सम्पर्क साधला जाईल. पहिल्या टप्प्यात १३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यां लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल. शहरी भागात आरोग्य सेवा व्यवस्थित पुरविल्या जातात, मात्र ग्रामीण भागात लसीकरण करताना काय अडचणी येतात याची पहाणी करण्यासाठी नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात ड्राय रन घेण्यात आला.
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ड्रायरन सुरू करण्यात आले त्यापूर्वी परिसरातील स्वच्छता करणे गरजेचे होते परंतू ड्रानरन सुरू असताना स्वच्छता करण्यात आली आहे. ड्रायरन सुरू असताना वैद्यकीय अधीक्षिका यांनी हनुवटीवर मास्क लावून ड्रायरन कार्यक्रमात दिसून आले. ठिकठिकाणी कापसाचे बोळे पडलेले होते. ड्रायरनचे प्रात्यक्षिक करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांना अस्वच्छ उघड्या गटारीवर हात स्वच्छ धुवावे लागले येथे हॅण्डवाॅशचे भांडे दिसून आले नाही. लसीकरणाचे प्रतिक्षा कक्षात पुरेसे उजडे दिसून आले नाही.