अमळनेर (प्रतिनिधी) येथील अमळनेर महिला मंच ट्रस्ट आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कोरोना योद्धा यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अपर्णा मुठे, प्रमुख वक्ते माजी आमदार डॉ.बी. एस.पाटील, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ.भारती पाटील, अमळनेर महिला मंचच्या उपाध्यक्षा तिलोत्तमा पाटील, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकारी संचालिका रेणू प्रसाद, ज्येष्ठ डॉ.अनिल शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी कोरोना या विषयावर जाणीव जागृती गीत वसुंधरा लांडगे यांनी अप्रतिम सादर केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भारती पाटील यांनी केले प्रास्ताविकात अमळनेर शहरात कोरोनाला हरविण्यासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले त्यांचे या प्रसंगी स्मरण करून त्यांना मनापासून धन्यवाद म्हणण्यासाठी आजचा उपक्रम असल्याचे त्यांनी आवर्जून म्हटले.
या कार्यक्रमासाठी अमळनेर शहरातील नामांकित डॉक्टर, परिचारिका भगिनी, ब्रदर्स बंधू, आधार संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते समानार्थी म्हणून उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.अविनाश जोशी, डॉ.अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. परिचारिका भगिनी यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिभाताई नेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या वतीने अश्वमेघ पाटील यांनी कोरोना जाणीव जागृती कविता सादर केली.
प्रमुख वक्ते डॉ.बी.एस.पाटील यांनी कोरोना विषयी जनजागृती करण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या डॉक्टर यांचे अभिनंदन केले. आता आपल्याला कोरोना सोबतच जगायचे असून सर्व काळजी घेऊन आपण तशी तयारी ठेवली पाहिजे आणि सर्वात जास्त जे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्याकरिता शाळा लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. अपर्णा मुठे यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य खचू न देणारे व्यक्तींचे मनापासून स्वागत केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आधार संस्थेच्या अश्विनी भदाणे आणि अमळनेर मंचच्या पद्मजा पाटील यांनी केले. आभार उज्वला शिरोडे यांनी व्यक्त केले. सन्मानार्थी डॉक्टर- डॉ.बी.एस. पाटील, डॉ.अविनाश जोशी, डॉ.अनिल शिंदे, डॉ.निखील बहुगुने, डॉ.संदीप जोशी, डॉ.किरण बडगुजर, डॉ.प्रकाश ताळे, डॉ.जी एम पाटील, डॉ.विलास महाजन, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.आशिष पाटील, डॉ.विक्रांत पाटील, डॉ.हेमंत कदम, डॉ.सुशीलकुमार बडगुजर, डॉ.देवयानी बडगुजर, डॉ.राजेंद्र शेलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्या हजारे, कलीम खान, तौसिफ शेख, वैशाली सैंदाणे, संजय कापडे, मनीषा खैरनार, राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले.