कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लहान भाऊ असीम बंदोपाध्याय यांचं शनिवारी सकाळी निधन झालंय. जवळपास महिन्याभरापासून ते कोरोना संक्रमणाशी लढत होते.
असीम बंदोपाध्याय महिनाभरापासून कोरोनाने ग्रस्त होते. मात्र उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोविडच्या नियमांनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे. कोलकात्यातील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तरीही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. असीम यांची तब्येत आज सकाळी अचानक खालावली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं मेडिको सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं. कोरोनामुळे त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड खालावली होती, असं डॉ. आलोक रॉय यांनी सांगितलं. कालिघट याठिकाणी असीम राहत होते.