नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता रुग्ण संख्येची त्सुनामी येत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९११ नव्या रुग्णांची भर पडली असून ३,५२१ रुग्णांचा मृत्यू आहे. शुक्रवारी देशात जवळपास २ लाख ९८ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी ४ लाख १ हजार ९११ नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी ५८,७०० केस समोर आल्या. तर जगात सर्वात जास्त मृत्यू भारतामध्येच होत आहेत. काल येथे कोरोनामुळे ३,५२१ लोकांचा मृत्यू झाला. हा देखील एक विक्रम आहे. सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. येथे ८२८ संक्रमितांनी प्राण गमावले आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये एकूण नवीन केस आले :४.०१ लाख
गेल्या २४ तासांमध्ये एकूण मृत्यू : ३,५२१
गेल्या २४ तासांमध्ये एकूण बरे झाले : २.९८ लाख
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : १.९१ कोटी
आतापर्यंत बरे झाले :१.५६ कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : २.११ लाख
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :३२.६४ लाख
महाराष्ट्रात शुक्रवारी ६२,९१९ लोक संक्रमित आढळले. ६९,७१० लोक रिकव्हर झाले आणि ८२८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात ४६ लाख ०२ हजार लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये ३८.६८ लाख लोक बरे झाले आहेत. तर ६८ हजार ८१३ लोकांचा मृत्यू झाला आहे. ६ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर अजुनही उपचार सुरू आहेत