जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद येथील लाचखोर पोलीस कर्मचारी सतीश रमेश पाटील (४३, रा. सिध्दी विनायक कॉलनी, पिंप्राळा) याला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी शनिवारी सेवेतून निलंबित केले आहे.
सतीश रमेश पाटील (४३, रा. सिध्दी विनायक कॉलनी, पिंप्राळा) याला ८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजता नशिराबाद पोलीस ठाण्याच्या आवारातच पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सतीश पाटील याला न्यायालयाने ११ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची चौकशी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, आज पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सतीश पाटीलला निलंबित केल्याचे आदेश काढले.