नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर (MNS Ayodhya Tour) जाणार आहे. दरम्यान, बृजभूषण यांनी केलेल्या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच बृजभूषण यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ‘ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या’ अशी मागणी कांचनगिरी यांनी केली आहे. जून महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. मात्र, “उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही”, अशी भुमिका भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. बृजभूषण यांच्या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मनसे नेत्यांनीही बृजभूषण यांना आव्हान दिले होते.
कोण आहेत कांचनगिरी?
कांचन गिरी यांचा जन्म झारखंडमधील हजारी वाघ येथे झाला आहे. कांचन गिरी यांचे पूर्वज बिहारमधील आहेत. त्या मागील २५ वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत. त्यांनी निसर्गाशी निगडीत असणारे आणि सध्याच्या परिस्थितीत सुधारणा हवी अशी कामे केली आहेत. कांचन गिरी यांनी भारतासह परदेशात देखील शेतकऱ्यांसाठी काम केले. गंगा यमुना या नद्यांमध्ये निर्माल्य टाकलं जातं ते साफ-सफाई करण्याची मोहीम कांचनगिरी यांनी हाती घेतली होती. तसेच देशातील इतर मुख्य नद्या सफाई करण्याचे ध्येय हाती घेतले होते. देशात हिंदू धर्माचा प्रसार करण्यासह युरोपीय देशात देखील कांचनगिरी यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला आहे.