जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली, ती तुम्हाला शोभत नाही, याचा राग आल्याने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली धरणगावच्या दुतीया दांपत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, हेमंत नवनीतलाल दुतीया याच्यावर मुख्यमंत्र्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप होता. यानंतर आयनॉक्स थेटरमधून पडल्यावर हेमंत दुतीया यांना ज्योती ज्ञानेश्वर शिवदे (रा. जळगाव) यांनी मुख्यमंत्र्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे शोभत नसल्याचे म्हटले. त्यावर हेमंत नवनीतलाल दुतीया, गौरी हेमंत दुतीया, आरेश प्रेमजी बाठे, पुंडलिक महादू सातपुते, भूषण नामदेव सोमवंशी (सर्व. रा. धरणगाव) यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच या झटापटीत ज्योती शिवदे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.