बीड (वृत्तसंस्था) गुटखा प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अवैध गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेटचा बीड पोलिसांनी इमामपुर येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला आहे.
काल बीड परिसरातील दोन ठिकाणी छापे मारून जवळपास ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतु यातील मुख्य आरोपी सत्ताधारी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असल्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद होण्यास विलंब झाला होता. अखेर या प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह इतर तीन जणावर कलम ३२८,२७२, २७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याविषयी पोलीस अधीक्षकांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असून या प्रकरणात आरोप असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलीक खांडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुटखा प्रकरणात कारवाई झाली असता कार्यकर्त्याचा फोन आला म्हणून मी घटनास्थळावर ते गेलो होतो. त्यामुळे मला या प्रकरणात गोवलं गेलं असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला आहे.