जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गोंद्री येथील युनुस वजीर तडवी याचा सोमवार पहाटे रोजी गळफास घेऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. युनुस तडवी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी पत्नी वजीरा तडवी हिला अटक केली असून प्रियकर फरार झाला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, युनुस तडवी याचा सोमवार रोजी पहाटे गळफास घेऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याबाबत आईसह नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. आई रेशमबाई हीने दिलेल्या फिर्यादीत वजीरा व नाना पुनमचंद नाईक यांच्यात संबंध असल्याचे म्हटले आहे. त्यांनीच मुलाचा घातपात केला असल्याचे या फिर्यादीत म्हटले होते.
त्यावरून पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नी वजीरा तडवी हिला अटक करण्यात आली आहे. तर प्रियकर फरार झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहेत.















