लखनौ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेश राज्यातील बागपत येथे दिवसाढवळ्या २१ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. यावेळी तरुणीची ८ वर्षीय भाच्चीही दिपासमवेत होती. या घटनेवेळी ती मदतीसाठी मोठमोठ्यानं हाक देत होती. मात्र, कुणीही मदतीला आलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
रिंकूसोबत आणखी कोण कोण होते, हे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तपासण्यात येत आहे. याप्रकरणी आणखी कोणाचे नाव समोर आल्यास, त्यासही अटक करण्यात येईल, असे बागपतचे एसपी नीरज कुमार यांनी म्हटलं आहे. बागपतच्या संकरी गल्लीत कॉलेजमधील क्लर्क असलेले नैनसिंह राहत होते. त्यांना ७ मुली असून सर्वात लहान मुलगी ही दिपा होती. त्यांच्या सहाही मुलींचे लग्न झाले होते. तर, दिपा ही पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. घरची परिस्थिती नाजूक असल्याने दिपा कुटुंबीयांचा सहारा बनू इच्छित होती. तिला शिक्षिका व्हायचं होतं, त्यासाठी सकाळी ११ वाजता नोकरी अर्ज करण्यासाठी ती घरातून बाहेर पडली. त्यावेळी रिंकूने भरचौकात तिचा हात पकडून तिच्यासोबत -fully जबरदस्ती केली. त्यानंतर, तिच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. दिपासोबत असलेल्या तिच्या भाच्चीने ही घटना कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर, घरच्यांनी घटनास्थळ गाठले. पण, दिपा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. तर, इकडे रिंकूने पोलीस ठाणे गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. दरम्यान, रिंकू कश्यप दिपावर एकतर्फी प्रेम करत होता, दिपाने त्यास बोलण्यास नकार दिला. त्यावेळी, मला बोलली नाहीस तर तुला ठार मारेन, अशी धमकीही रिंकूने दिपाला दिली होती.