नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उन्हाळा सुरू होताच बहुतांश घरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी एसीचा वापर केला जात आहे. नुकताच समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचा एसी वापरण्यापूर्वी विचार करायला भाग पडेल. एक साप उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी एसीत कुंडली मारून बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
साप बघितल्यानंतर अनेकजण त्या वाटेने जाणं टाळतात. पण सापाने आपल्या घरातच त्याचं घर बनवलं असेल तर काय करणार? साप आपल्या घरातील कोणती वस्तू घर बनवेल सांगता येत नाही. एका उंदराची शिकार करताना ही बाब समोर आली. व्हायरल व्हिडीओत पाहू शकता एक विषारी साप आपलं भक्ष्य असलेला उंदीर पकडण्यासाठी एसीतून बाहेर आला असून उंदराला गिळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सापाचा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्याखाली प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. तसेच आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना याबाबत सूचना देखील करत आहेत.