राशिभविष्य, शुक्रवार १७ जून २०२२ : आज चंद्राचा संचार दिवस-रात्र मकर राशीत असेल.
मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वाहने जपून चालवावीत.
कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.
सिंह : संततीचे प्रश्न निर्माण होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुळ : शत्रुपिडा नाही. मुलामुलींचे निर्णय मार्गी लागतील.
वृश्चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जिद्दीने कार्यरत रहाल.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सौख्य लाभेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. एखादी चिंता लागून राहील.
मीन : व्यवसायात जर वाढ होईल. सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.