मेष: आजचा दिवस फलदायक ठरणार आहे. उत्साह व उमेद वाढेल. नोकरी-व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणुकीची कामे दुपारपूर्वी करावीत. कामाच्या ठिकाणी तुमच्या भूतकाळातील काही चुका उघडकीस येऊ शकतात. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल.
वृषभ : आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. जर तुम्ही पूर्वी कोणाला पैसे दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : आज तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. कोणत्याही चुकीच्या कामाला होकार देऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.
कर्क : अचानक लाभ झाल्याने तुमचे मन आज आनंदी असेल. महत्त्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नेटवर्किंग क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आनंदी राहाणार आहात.
सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून चांगला असणार आहे. कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. तुम्हाला एकापेक्षा जास्त कामातून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. उत्साह व उमेद वाढेल.
कन्या : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. खूप खस्ता खाल्ल्यानंतरच तुम्ही यश मिळवू शकाल. परंतु तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे टाळावे लागेल. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. दुपारनंतर काहींना एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.
तुळ : कोणताही निर्णय घेताना तुम्हाला पूर्ण विचार करावा लागेल, नाहीतर तुमच्याकडून चूक होऊ शकते. मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आनंदी व आशावादी राहाल. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून आराम मिळत असल्याचे दिसत आहे. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे.
वृश्चिक : आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. नोकरी-व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. वरिष्ठांशी बोलताना तुम्हाला वागण्या बोलण्यात नम्रता ठेवावी लागेल. कौटुंबिक बाबी चव्हाट्यावर जाऊ देऊ नका. दुपारनंतर विशेष उत्साही राहाल. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मानाचे योग येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल.
धनु : आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी नवीन यश घेऊन येईल. दुपारनंतर तुमची मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कोणत्याही कामात जोखीम घेणे टाळावे लागेल, नाहीतर अडचणी येऊ शकतात. कामाचा ताण मात्र असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
मकर : आज तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. तुम्ही तुमच्या काही आरामदायी वस्तूंच्या खरेदीवरही भरपूर पैसे खर्च कराल. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे.
कुंभ : आजच्या दिवशी एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळवण्याची शक्यता आहे. दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. तुमच्या मुलाच्या नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.
मीन : आज खर्चाचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील आणि बाहेरील लोकांशी ताळमेळ राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आरोग्य जपावे. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावीत. मनोबल कमी राहील.