मुक्ताईनगर (प्रतिनिधी) अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकासान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले गेले आहे. तसेच काहींची जीवितहानी होता होता राहिली असून काहींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. सदर भागात मेंढोळदे, उचंदा, शेमळदा, नायगांव, बेलसवाडी, कर्की व धाबे पिंप्री या गावांमध्ये शेती व घरांची पाऊस व जोरदार वादळामुळे झालेल्या नुकसानीची खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त व जखमी, शेतकरी व नागरिकांचे सांत्वन केले.
तसेच शासनाकडे पाठपुरावा करून, लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही खा. रक्षाताई खडसे यांनी दिले. यावेळी नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात जि.प.समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, पं.स.सभापती सुवर्णा साळुंके, जि.प.सदस्य वैशाली तायडे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, तालुका उपाध्यक्ष विनायक पाटील, तालुका उपाध्यक्ष सुनिल पाटील, भाजयुमो तालुका सरचिटणीस सोमनाथ पाटील, प्रशांत महाजन अंतुर्ली, प्रदिप साळुंके, भैय्या पाटील, प्रशांत महाजन नायगांव, किशोर महाजन, सरपंच जावजी धनगर, रहस्य महाजन, पंकज पाटील, अतुल महाजन, पंकज महाजन, सरपंच सोपान सपकाळे, बेलसवाडी सरपंच शकील खान, विनोद महाजन, सोपान जावरे यांच्यासह मुक्ताईनगर तहसिलदार श्वेता संचेती, गट विकास अधिकारी नागतिलक, कृषी अधिकारी माळी, विस्तार अधिकारी आर.एल.जैन, तलाठी गणेश जरे, तलाठी पी.आर.शिंपी, तलाठी मराठे, पोलीस पाटील शांताराम बेलदार, ग्रामसेवक विलास महाजन, ग्रामसेवक एकनाथ कोळी इ. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
















