जळगाव (प्रतिनिधी) लग्न समारंभात हातात पिस्तुल व तलवार घेवून नाचणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. हा व्हिडीओ धरणगाव येथील गॅस गोडावून असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओची तात्काळ गंभीररित्या दखल घेत पोलिसांचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ बीड येथे रवाना करण्यात आले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
धरणगाव येथील भारत गॅस गोडावूनजवळ विवाह सोहळा होता. या सोहळ्याला पाहुणे म्हणून आलेल्या तरुणांकडून डिजेवर गाणे लावून नाचत होते. यावेळी पोलिसांसारखा पेहराव असलेल्या एका इसमाने त्याच्याजवळील असलेले पिस्तुल दुसऱ्या तरुणाच्या हातात दिले. त्यानंतर तो तरुण ते पिस्तूल हातातवर करुन जलने वालो को जलने दे या गितावर तर त्याच ठिकाणी दुसरा युवक हा हातात तलवार घेवून तो बाप तो बाप रहे गा या गितांवर नाचत दहशत माजवितांना दिसून आला. लग्नात असलेल्या पाहुणे मंडळींनी तो व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कारवाई करण्याच्या दिल्या सूचना
सोशल मीडियावर व्हायर झालेल्या व्हिडीओ माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी लागलीच हा व्हिडीओची सत्यता पडताळण्याकरीता तो पोलीस अधीक्षकांना पाठविला. पोलिस अधीक्षकांनी त्या व्हिडीओची गंभीर रित्या दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पिस्तूल घेवून नाचणाऱ्याच्या शोधार्थ पथक बीडला रवाना
पोलीस अधीक्षकांचे आदेश मिळताच धरणगाव पोलिसांनी त्या व्हिडीओमध्ये पिस्तुल व तलवार घेवून नाचणाऱ्यांनी नावे निष्पन्न केली. त्यातील पिस्तुल घेवून नाचणारा तरुण हा बीड येथील असल्याचे समजले. तो इसम नातेवाईकांकडे लग्नाला आला होता. त्याच्या शोधार्थ धरणगाव पोलीसांचे पथक रवाना झाले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
















