अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोण येथील एका घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने तसेच मुर्त्यांसह रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात निलेश बापूराव पाटील (वय ३५ रा. लोण ता. अमळनेर ह.मु. मुंदडा नगर ४, आर. के. नगरच्या मागील बाजूस अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २ मे २०२२ रोजी ते दि. ७ मे २०२२ चे रोजी ८ वाजेच्या दरम्यान माझे राहते घराचे लोंखडी गेटचे व मुख्यदरवाजा कडीकोंडा कुलुप तोडुन आत प्रवेश करुन २८ हजार रुपये किंमतीचा १४ भार वजनाचे त्यात सप्तशृंगी देवीची चांदीची ६ भार, गणपतीचा चांदीचा दोन भार बिजासनी मातेची चांदीची चार भार वजनाच्या मुर्त्या तसेच एक बार वजनाचा चांदीचा गोफ, एक भार वजनाचे दोन चांदीचे कडे, १५ हजार किंमतीचा ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बदामी आकाराची अंगठी, ९ हजार रुपये किंमतीचा ३ ग्रॅम वजनाची सोन्याची बदामी आकाराची अंगठी, ३३ हजार रोख रक्कम, असा एकूण ५९ हजार ८०० रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोना सुनिल महाजन हे करीत आहेत.