धरणगाव (प्रतिनिधी) येथील मातोश्रीनगरात घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाखांचा ऐवजवर डल्ला मारला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, सुरेखा भदाने (वय-४८, रा. मातोश्री नगर, धरणगाव) हे कुटुंबीयांसह राहतात. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २९ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील ५ हजार रुपयांची रोकड आणि २ लाख ४६ हजार ३२० रुपयांचे दागिने असा एकूण २ लाख ५१ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सुरेखा भदाणे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि गणेश अहिरे करीत आहेत.