धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील झूरखडे येथे अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी करत तब्बल 2 लाख 16 हजारांचा अवस्था लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात पानाचं नारायण चौधरी (वय 60) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजीच्या सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने झुरखेडा गावातील बंद घराच्या दरवाजाचा कोंडा तोंडुन घरात प्रवेश केला.त्यानंतर घरातील २ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने व रोख रुपये लंपास केला आहे. तसेच गावशेजारील निमखेडा बस स्टॅड जवळील भगवान ज्ञानेश्वर पाटील यांचे मनिष किराणा दुकान उघडुन त्यातुन किराणा मालाची चोरी देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहे.