जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मुक्ताईनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत मोटार सायकल, लॅपटॉपसह ७ हजाराची रोकड लंपास केली आहे.
शहरातील मुक्ताईनगर परिसरात दिलीप धनसिंग पाटील (वय ४८ रा. प्लॉट नं. ३८/B गट नं ३०/१+२+३ मुक्ताईनगर बंधू डीपीजवळ, जळगाव) हे वास्तव्यास आहेत. अज्ञात चोरट्यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १.०० ते दुपारी १२.१५ वाजेच्या दरम्यान घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत होंडा शाईन कंपनीची सिल्वर मो.सा.(क्र. MH १९ AT २९०८), HP कंपनीचे लॅपटॉप, DELL कंपनीचे डेक्सटॉप कॉम्पुटरची स्क्रीन, CPU, माउस, होम थिएटर, ७००० रुपये रोख रक्कम असा ऐवज लांबविला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका तुषार जावरे हे करीत आहेत.
















