पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) शेंदुर्णी येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, डॉ. सागर सूनीलराव गरुड (वय ३५, रा. शेदुर्णी ता. जामनेर, ह. मू. पाचोरा जिल्हा जळगाव) यांचे शेंदुर्णी येथील बंद घर अज्ञात चोरट्यांनी दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.०० ते दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी-कोडा व कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लोखंडी पत्राचे कपाट उघडुन त्यातील लॉकरमधील ९०,००० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख असा रक्कम एकूण १ लाख ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप निरी. संदीप चेडे हे करीत आहेत.