जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली प्र.बो गावातील बालाजी नगर भागातील दोन घरातून सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महेंद्र रामदास चव्हाण (वय २९ रा. शिरसोली प्र.बो ता.जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ९ जून २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने महेंद्र चव्हाण व त्यांच्या शेजारील यांचे घराचे कडीकोंडा तोडुन घरात अनाधीकृतपणे प्रवेश करुन कपाटात ठेवलेले १ लाख ७ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, ६५ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास API अमोल मोरे हे करीत आहेत.