जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी हद्दीतील जी २० सेक्टर भोलेनाथ नावाच्या कंपनीतुन अज्ञात चोरट्याने रोकडसह मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील एमआयडीसी हद्दीतील जी २० सेक्टर भोलेनाथ नावाच्या कंपनीत अज्ञात इसमाने कंपनीत आत प्रवेश करुन दिनांक ०९/०२/२०२२ रात्री ११.३० वा ते दिनांक १०/०२/२०२२ चे सकाळी ०९.०० वाजेच्या दरम्यान गोडावुनचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला. तसेच ऑफिसमध्ये घुसून लॉकरचे कुलूप तोडुन १ लाख ५२ हजार रुपये व ५०० रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरुन नेला. याप्रकरणी अमर दयालदास कटियारा (वय ४२ रा. सिंधी कॉलनी, नानक नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी अमोल मोरे करीत आहेत.