TheClearNews.Com
Sunday, July 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : भिल्ल समाज बांधवांची इनामी जामीन केली परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर !

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; अपर जिल्हाधिकारींनी दिले चौकशी आश्वासन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2020
in जळगाव, पारोळा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आदिवासी भिल्ल समाजाच्या व्यक्तींना मिळालेली इनामी जमीन एरंडोल प्रांतधिकाऱ्यानी आम्हाला कुठलीही नोटीस न देता अवघ्या ७ दिवसात परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तक्रारीची अपर जिल्हाधिकारींनी गंभीर दखल घेत चौकशीचे आश्वासन  दिले आहे. या जमिनीची किंमत लाखोच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एका पिडीतने पारोळा पोलीस स्थानक तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद देऊन देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीय.

 

READ ALSO

बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य

तक्रारदार कैलास बापु भिल, सचिन भिकन भिल, रघुनाथ भिकन भिल, शोभाबाई भिकन भिल (सर्व रा. कराडी ता.पारोळा) यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आमचे पणजोबा कैं. हरी कमल भिल यांना सरकार तर्फे १९६३ झाली जुना सर्वे नंबर १०१ म्हणजेच आताचा गट क्रमांक ९१ मिळकत क्षेत्र ३ हेक्टर ४० आर आकार ८.३५ पैसे हे शेत सरकारी पडीत आकरी असल्याने व आम्ही भिल्ल आदिवासी असल्याने शासनाने अलोट कसून खाण्यास दिलेली होती. सदर मिळकतीचा आमचे पणजोबा हरी भिल यांच्यापासून ते आमचे आजोबा अभिमान हरी भिल यांच्या नावे पिक पेरा लागत होता व चालू होता. सदरचा पिक पेरा १९९४ पावतो अभिनव भिल यांच्या नावे होता. परंतू नंतर सदरची शेतजमीन आमच्या ताबे कब्जा उपयोगात असून आमच्या नावाचा पिक पेरा लागणे बंद दिसून येत आहे.

 

आम्ही आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने अशिक्षित असल्याने आमचे नावे पिक पेरा लागतो किंवा नाही याची आम्हाला कल्पना आली नाही. तसेच आमच्या या वर्णन केलेल्या जमिनीशी गावातील रामकृष्ण पुंडलिक पाटील, दीपिका रोहिदास पाटील, सुरेखाबाई पुंडलिक पाटील यांचा दुरापास्तच संबंध नसताना तसेच त्यांचे सदर जमिनीशी कुठलाही कोणताही नाव किंवा हकीगत संबंध नसताना, त्यांनी आमची शेत जमीन त्यांच्या नावे करून घेणे कामी दिनांक नसलेला अर्ज उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्याकडे केला होता. त्याची कुठलीही शहानिशा न करता मंडळ अधिकारी यांच्या चुकीच्या अहवालावरून तसेच चौकशी न करता १० ऑगस्ट रोजी आदेश पारित करून थकीत तगाई कर्ज भरून वर उल्लेखित आमच्या कब्जे उपभोगातील शेतजमीन वरील तिन्ही लोकांचे नावे करून देण्याचे आदेश पारित केला आहे.

 

वास्तविक पाहता सदरची शेत जमीन आजही आम्हीच कसत असून आम्हीच उत्पन्न घेत आहोत. आमचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीतून सुरू आहे. सदर शेत जामीन शिवाय आम्हाला उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. तसेच शेत मिळकती वरील तिन्ही व्यक्तींचा काहीही संबंध नसून त्यांनी सर्कल तामसवाडी यांना हाताशी धरून व हातमिळवणी करून सदरचा अर्ज करून आमची जमीन स्वतःच्या नावे लावून घेण्याचा घाट घातला. तसेच या संबंधात चुकीचा आदेश एरंडोल उपविभागीय अधिकारी यांनी त्याबाबतची नोंद क्रमांक १६७८ पारित करून समोरच्या व्यक्तीचा काहीएक संबंध नसताना व कोणते कागदपत्र न पाहता आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस, सूचना न देता समोरच्यांच्या नावावर केली आहे.

 

सदर मिळकत भिल्ल समाजाची ताबे उपभोगात असताना केवळ आम्ही भिल्ल आहोत आम्हाला कोणत्याही कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे आमच्या अनाडी पणाचा फायदा घेऊन संबंधित यांच्या नावे करण्यात आली असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. तसेच आमच्या कब्जा उपभोग आतील करडी शिवरात्रि क्षेत्र गट क्रमांक ९१ संदर्भात विभागीय आयुक्त संकीर्ण कवी ४३५/२०२० रोजी पारित केलेला आदेश व त्यावरून झालेली फेरफार क्रमांक १६७८ रद्द करण्याचा आदेश द्यावा व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी व आम्हाला न्याय द्यावा, असे देखील म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात पिडीत आदिवासी भिल्ल बांधवांनी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची भेट घेत नुकतीच आपली व्यथा मांडली. त्यानंतर श्री. महाजन यासबंधी सर्व कागदपत्रांची झेरॉक्स करून घेत सुमोटो अॅक्शन घेत सर्व रेकॉर्ड पारोळ्याहून मागवून तक्रारीची गंभीरतेने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार

याबाबत विश्वनाथ फुला भिल यांनी पारोळा पोलीसात तसेच पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पुंडलिक नथ्यू पाटील, रोहिदास शांताराम पाटील, रामकृष्ण पुंडलिक पाटील व इतर दोन महिलांनी ३१ ऑक्टोबर रोजी गावाच्या बस स्थानकावर अडवून शेतात पाय ठेवला तर तुमच्या त्याच शेतात मूडदा पाडू अशी धमकी देत जाती वाचक शिवीगाळ केली. याबाबत तक्रार देऊन देखील अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 25, 2026
विशेष लेख

सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य

July 25, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जुलै 2026 !

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

एरंडोल येथे स्थलांतरीत कामगारांचे जनरल चेकअप कॅम्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेता सलमान खानला सर्पदंश ; पनवेलच्या फार्महाउवर घडली घटना !

December 26, 2021

लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

May 29, 2025

चिंता वाढवणारी बातमी : भारतात २४ तासांत आढळले ३५ हजार ८७१ कोरोना रुग्ण

March 18, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २३ डिसेंबर २०२४ !

December 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group