चोपडा (प्रतिनिधी) येथील मन्यार अली भागातील एका घरातून अज्ञात चोरट्याने २ लाख २६ हजारांची रोकड लंबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सलीम अजीज शेख (वय ४८, रा. मन्यार अली चोपडा ह.मु. राबोळी पल्लवी अपार्टमेंट 4 था माळा रूम नंबर १८ ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ मे २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोपडा शहरात मन्यार अली भागात सलीम शेख हे राहत असलेल्या घरातील पुढच्या रूममध्ये बॅगेत ठेवलेले २ लाख २६ हजार रुपये कुणी तरी अज्ञात चोरत्या चोरून नेले आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.