अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सिंधी कॉलनीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, किशोर लालचंद डावरणी हे शहरातील सिंधी कॉलनीत वास्तव्यास आहेत. दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ११.५० ते २८ फेब्रुवारी २०२२ रात्री २.०० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने डावराणी यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरातील १० हजाराची रोकड, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील काप व ५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या धातूच्या बाह्या असा एकूण ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुनिल राजाराम पाटील हे करीत आहेत.