धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडा रोडवरील एका ठिकाणी धाडसी सुरू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी साधारण सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, मधुकर झिपरू मिस्तरी यांचे चोपडा रस्त्यावरील दुकानातून अज्ञात चोरट्यांनी वेल्डिंग मशीन, रसवंती मशिन, इलेक्ट्रिक मोटार, वायर बंडल, ईले.मोटार स्विच, वेल्डिंग रॉड आदी साहित्य असे एकूण अंदाजित एक लाख ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरी केला आहे.
दि.४ एप्रिल, २०२२ रोजी, मधुकर मिस्तरी हे सकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकानावर गेल्यावर दुकानाचे शटरचे उघडे होते. आत गेल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत दुकानदाराकडून संपूर्ण माहिती जाणून घेतलीय. यावेळी पोहेका विनोद संदानशिव, सामाजिक कार्यकर्ते आबा वाघ हे उपस्थित होते.