एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील सावता माळी नगरमधील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाखाची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, प्रवीण तुकाराम मिस्तरी (रा.सावता माळी नगर) यांच्या बंद घरातून दि. १४ एप्रिल दुपारी ३ ते १६ एप्रिलच्या २ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गोदरेजच्या कपाटातील २ लाखाची रोकड लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शरद बागल हे करीत आहेत.