यावल (प्रतिनिधी) येथील विस्तारित भागातील वस्तीत राहणाऱ्या एका विवाहीत शिक्षकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
यावल येथील विस्तारीत वसाहतीमधील बालाजी सिटी या परिसरात राहणारे व वाघझीरा (ता. यावल) येथील आदीवासी आश्रमशाळेत शिक्षक नितिन लक्ष्मण निंबाळे (वय ४५) हे २४ जुलै रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे फिरण्यासाठी गेले होते. परिसरातील बालाजी मंदिराजवळ असलेल्या कोरड्या विहिरीच्या ओटयावर बसले असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिलींद दिलीप मिस्त्री यांच्या खबरीवरून यावल पोलिसतिं अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. मयत शिक्षक नितिन निंबाळे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आह.