फैजपूर (प्रतिनिधी) शासकीय आणि निमशासकीय सेवेत आलेल्या तमाम डीसीपीएस धारक बंधू-भगिनींना द्यावयाच्या त्यांच्या मासिक कपातीचा हिशोब ३१ डिसेंबर २०२० पूर्वी देणे बंधनकारक आहे. आज ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय बी.जे. पाटील यांचे शुभहस्ते वेतन पथक कार्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
माध्यमिक शिक्षण विभाग जि. प. जळगाव व वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाच्या वतीने कार्यालयाच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय आणि निमशासकीय सेवेत आलेल्या तमाम डीसीपीएस धारक बंधू-भगिनींना द्यावयाच्या त्यांच्या मासिक कपातीचा हिशोब देणे बंधनकारक आहे. सदर संकेतस्थळामुळे जिल्हाभरातील तमाम डीसीपीएस धारक माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना त्यांच्या २०१६-१७ ते २०१९-२० या कालखंडातील मासिक कपातीच्या व्याजासह जमा रकमेच्या पावत्या मिळणे सोयीस्कर झालेले आहे. लवकरच भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या देखील सदर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी वेतन पथक अधिक्षक शर्मा साहेब, सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, रवींद्र घोंगे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे. के. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील सोनार, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, सचिव प्रा. शैलेश राणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अतुल इंगळे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड उपस्थित होते.