जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एका परिसरातील २४ वर्षीय प्राध्यापक तरुणीचे बनावट इस्टाग्राम खाते बनवून तरुणीच्या नावाने तिच्या ओळखीच्या लोकांना रिक्वेस्ट पाठवून अब्रूनुकसान केल्याबाबत सायबर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, २४ वर्षीय प्राध्यापक तरुणीचे सोशल मिडियामधील इस्टाग्राम खाते बनावट बनवत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बदनामी होईल असे आक्षेपार्ह फोटो व व्हीडीओ स्टेट्सला ठेवून व पीडितेच्या ओळखीच्या लोकांना रिक्वेस्ट पाठवत बदनामी केली. तसेच पीडितेला मेसेज करीत बदनामी केल्याप्रकरणी एका विरोधात सायबर पोलिसात पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नी. दिलीप भागवत हे करीत आहेत.